अवसायक गणेश गायकवाड यांची माहिती
अहमदनगर | प्रतिनिधी
Ahmednagar: अवसायानात गेलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पाच लाखांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्याच्या ठेव पावतीच्या 50% रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात आजपासून (7 जुलै) वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.
✅ 1926 ठेवीदारांना होणार थेट लाभ
DICGC कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, पात्र ठेवीदारांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 1926 ठेवीदारांचा समावेश असून, ज्यांनी विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म भरले आहेत व KYC अपडेट केले आहे, त्यांना हा लाभ मिळणार आहे.
🏦 रक्कम थेट खात्यात जमा
संबंधित ठेवीदारांनी आपल्या नवीन बँक खात्यांची माहिती शाखांना दिलेली असल्यामुळे, ही रक्कम थेट त्याच खात्यात जमा होईल. या प्रक्रियेमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे हि वाचा : शहरातील अवैध दारुसाठा जप्त